माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल या केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश आहे. माजी अग्निवीरांना वयोमर्यादेच्या अटीमध्ये देखील सवलत मिळेल, तसंच त्यांच्यासाठी कोणतीही शारीरिक क्षमता चाचणी होणार नाही. या निर्णयाद्वारे गृह मंत्रालयांनं एक मोठं पाऊल उचललं आहे, असं केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या महासंचालक नीना सिंग यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत १० टक्के आरक्षण
