नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून पहाटे दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर ही विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रेल्वेवर देखील चर्चगेट आणि विरार दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. पहिली ट्रेन चर्चगेटहून पहाटे सव्वा वाजता, दुसरी २ वाजता, तिसरी अडीच वाजता आणि चौथी पहाटे ३ वाजून २५ मिनीटांनी सुटेल. विरारहून पहाटे सव्वा बारा वाजता, त्यानंतर पाऊण वाजता, १ वाजून ४० मिनीटांनी वाजता आणि शेवटची गाडी पहाटे ३ वाजून ५ वाजता सुटेल.
Site Admin | December 27, 2024 4:02 PM | Central and Western Railway