गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असं केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहलं आहे.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्या अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांनी साक्षीदाराची चौकशी ऑडिओ, व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून घ्यावी असं सरकारनं सांगितलं आहे.
Site Admin | July 16, 2024 8:01 PM | police station | witnesses | अजय भल्ला
साक्षीदारांच्या चौकशीसाठी पोलीसांच्या अखत्यारीतली जागा न निवडण्याचे केंद्रिय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
