भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक संस्था एफएसएसएआय नं कीटकनाशकांचा वापर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करण्याचं तसंच शेतकऱ्यांच्या स्तरावर कीटकनाशकांचे निरीक्षण आणि नियमन करण्यासाठी धोरणं विकसित करण्याचं आवाहन राज्यांना केलं आहे. केंद्रीय सल्लागार समितीच्या 44 व्या बैठकीला संबोधित करताना, संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष कमला वर्धन राव म्हणाले, कृषी पद्धती सुरक्षित आणि टिकून ठेवण्याचा उद्देश यामागे आहे. यामुळे अन्नातल्या कीटकनाशकांच्या अवशेषांशी संबंधित संभाव्य आरोग्य धोक्यांपासून ग्राहकांचं संरक्षण देखील होणार असल्याचंही ते म्हणाले. त्याशिवाय राज्यात फिरत्या खाद्यपदार्थ तपासणी प्रयोगशाळा तैनात करता येऊ शकतील अशा जागा शोधाव्यात अशा सूचना राव यांनी केल्या आहेत. या फिरत्या प्रयोगशाळा ग्राहक जागरुकता वाढवण्यासाठी आणि अन्न सुरक्षा पद्धतीविषयी महत्त्वाची माहिती प्रसारित करण्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतील असेही त्यांनी नमूद केलं.
Site Admin | August 24, 2024 10:19 AM | एफएसएसएआय | कीटकनाशक निरीक्षण