प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज कपूर हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हते तर सांस्कृतिक दूत होते. त्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर ओळख दिली, अशा शब्दांत प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका पोस्टद्वारे राज कपूर यांची प्रशंसा केली. राज कपूर यांचे सिनेमे कला, भावना आणि सामाजिक भाष्यासह सामान्यांच्या आकांक्षा आणि संघर्षाचे चित्रण करत, असे सांगत प्रधानमंत्र्यांनी राज कपूर यांच्या सिनेमांतील अजरामर भूमिका आणि सुमधूर गाण्यांचाही उल्लेख केला.
Site Admin | December 14, 2024 6:07 PM | PM | raj kapoor