डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 11, 2024 7:29 PM | Mumbai

printer

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची नियुक्ती केली आहे. 

या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेत आज सामंजस्‍य करार करण्‍यात आला. पालिका आयुक्‍त भूषण गगराणी, अतिरिक्‍त आयुक्‍त अभिजीत बांगर यांच्‍या उपस्थितीत या करारावर स्‍वाक्ष-या केल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा