डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा चौथा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आज नवी दिल्लीत ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण  मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचंं उद्घाटन होईल.  शिक्षण धोरणाच्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत शिक्षण विभाग आज वेगवेगळ्या भारतीय भाषा शिक्षणाला वाहिलेल्या दूरचित्रवाणी वाहिन्यां, दप्तराविना दहा दिवस, करिअरसंबधी सल्ला अशा वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात करत आहे.  विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञान व्यवस्थेवर आधारित भाषणं तसंच पुस्तकांचं उद्घाटन सुद्धा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते यावेळी होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा