कोणत्याही पक्षाला प्राधान्य न देता निष्पक्षपणे काम करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय निरीक्षकांना दिले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तैनात निरीक्षकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व उमेदवारांशी संपर्क ठेवा आणि त्यांच्या तक्रारी गांभीर्यानं घेण्याचे आदेश त्यांनी दिले. अवैध वाहतूक होत असलेल्या निर्बंधित वस्तू, पैसे, मद्य वगैरे सामानावर कडक लक्ष ठेवा. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला प्राधान्य देऊ नका, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या २८८ मतदारसंघात १४२ सामान्य निरीक्षक, ४१ पोलीस निरीक्षक आणि ७२ खर्च निरीक्षक कार्यरत आहेत.
Site Admin | November 12, 2024 8:26 PM | CEC Rajiv Kumar | Maharashtra Assembly Elections 2024.