केंद्र सरकार आणि त्रिपुरा सरकार, तसंच नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा, ऑल त्रिपुरा टायगर फोर्स या संघटनांमधे आज नवी दिल्लीत संघर्षविराम करार झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा तसंच गृहमंत्रालय आणि त्रिपुरा शासनातले अधिकारी उपस्थित होते.
या दोन्ही संघटनांनी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात यायचं ठरवल्यानं आणि त्रिपुराच्या विकासाप्रती वचनबद्धता दाखवल्यानं आनंद होतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये शांतता आणि समृद्धी यावी यासाठी नरेंद्र मोदी प्रणित सरकारनं आत्तापर्यंत १२ महत्वपूर्ण करार केले असल्याचं ते म्हणाले. सुमारे दहा हजार लोकांनी शस्त्रत्याग करून मुख प्रवाहात येण्याची तयारी दाखवली आहे असं देखील केंद्रीय गृहमंत्रांनी सांगितलं.