भारताला २०२७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात देशातल्या युवकांचा वाटा मोठा असेल, असं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. जनरल चौहान यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात छात्रांना मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. या छात्रांनी गेल्या वर्षभरात, एक पेड माँ के नाम अभियानात १ लाखाहून अधिक वृक्षारोपण केल्याबद्दल तर पुनीत सागर अभियानात ३२७ टन कचरा गोळा केल्याबद्दल सरसेनाध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं. या छात्रांनी कधीही हार मनू नये आणि राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं, असा सल्ला त्यांनी दिला.
Site Admin | January 13, 2025 8:19 PM | CDS | NCC