अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट या ई काॅमर्स कंपन्या काही निवडक कंपन्यांना पसंती देऊन गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचं भारतीय स्पर्धा आयोगाच्या निदर्शनाला आलं आहे. आयोगानं एका अहवालात या तपासाबद्दल माहिती दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी काही निवडक कंपन्यांनाच उच्च मानांकन दिलं असून ग्राहक एखादी वस्तू ऑनलाईन सर्च करत असताना त्यांना या कंपन्यांना जास्त पसंती असल्याचं दिसून येतं. यामुळे इतर कंपन्यांची उत्पादनं या स्पर्धेत मागे पडतात, असं या अहवालात म्हटलं आहे. या दोन्ही कंपन्या सध्या या अहवालाचा अभ्यास करत असून त्यानंतर आयोगासमोर आपली बाजू मांडणार आहेत.
Site Admin | September 13, 2024 1:20 PM | Amazon | CCI | Flipkart
अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचे आढळले
