नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ने राजस्थान आणि दिल्लीतील 27 शाळांना नोटिस बजावली आहे. यातील 22 शाळा दिल्लीतील असून, पाच शाळा अजमेर मधील आहेत.
मंडळाने या शाळांची अचानक तपासणी केली असता, त्यांच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या, विशेषतः नाव नोंदणी आणि नोंदणी नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्याचं मंडळाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.