केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरता ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. २०२४ मध्ये केंद्रीय विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या तसंच सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानशी संलग्न असलेल्या विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या मुली या योजनेकरता पात्र ठरणार आहेत.
२०२३ दरम्यान इयत्ता १० वीत शिकत असलेल्या, पालकांचं एकमेव अपत्य असलेल्या तसंच सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या मुलींच्या शिष्यवृत्तीच्या कालावधीत वाढ करण्यासाठीही मंडळानं अर्ज मागवले आहेत. हे अर्ज सीबीएसईच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून ते २३ डिसेंबर पर्यंत सादर करणं आवश्यक असल्याचं मंडळानं कळवलं आहे.