सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या दरम्यान, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे परीक्षेदरम्यान मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळलं तर पुढची दोन वर्षं परीक्षेला बसायला बंदी घालण्यात येणार आहे.
पूर्वी अशा प्रकरणांमध्ये एका वर्षासाठी बंदी घालण्याची तरतूद होती. मात्र, आता ती वाढवून दोन वर्षं केल्याची माहिती सीबीएसईच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे