डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 18, 2025 8:23 PM | CBSE

printer

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई प्रारुप लागू करणार

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रारुप लागू करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. याची अंमलजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी हे प्रारुप लागू होईल. त्याअनुषंगानं येत्या एक एप्रिलपासून इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू करण्याची चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात उरलेल्या इयत्तांसाठी सीबीएसईच्या प्रारुपाप्रमाणे नवे अभ्यासक्रम केले जाणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा