डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 5, 2025 7:58 PM | CBSE

printer

सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही, मराठी अनिवार्यच राहील, तसंच स्थानिक इतिहासही अभ्यासक्रमातून वगळला जाणार नाही, अशी ग्वाही शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी आज दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचानं आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राचा सीबीएसई पॅटर्न’ या चर्चासत्रात ते बोलत होते. या बदलामुळे शिक्षणशुल्कात काहीही बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सगळ्यात आधी सीबीएसईच्या शाळांमध्ये सुरू झाली असून हा अभ्यासक्रम म्हणजेच एनसीईआरटीचा अभ्यासक्रम राबवणं आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्य आणि सीबीएसईसह विविध बोर्डांच्या शाळांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या प्राचार्य भाग्यश्री पिसोळकर यांनी सीबीएसईचा अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप तसंच मूल्यमापनाची पद्धत याबद्दल तपशीलवार माहिती दिली. तर राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले यांनी सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. विविध शाळांचे शिक्षक, शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेले इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा