केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला. देशातल्या ७ हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. यंदा ४२ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी २४ लाख १२ हजारापेक्षा जास्त तर बारावीच्या परीक्षांसाठी १७ लाख ८८ हजारापेक्षा जास्त विद्यार्थींनी नोंदणी केली आहे.
१२० विषयांमध्ये परीक्षा देणार आहेत. भारतात ७ हजार ८४२ परीक्षा केंद्रे, तसेच परदेशी केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षा १८ मार्च, तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपणार आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं समुपदेशन सेवाही सुरू केली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळात ही सेवा उपलब्ध असेल.