डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 26, 2025 3:05 PM | CBI raids

printer

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरांवर सीबीआयचे छापा

सहा हजार कोटी रुपयाच्या महादेव ॲप प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई इथल्या घरांवर आज सीबीआयने छापा टाकला. त्याखेरीज ४ आयपीएस अधिकाऱ्यांसह ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापा टाकला. बघेल यांच्या निकटवर्तियांच्या घरं आणि आस्थापनांवरही  झडती सत्र राबवण्यात आलं. छत्तीसगडच्या विविध शहरांमधे मिळून एकूण २० ठिकाणी सीबीआयने कारवाई केली. या बेकायदेशीर बेटिंग ऐपद्वारे मोठ्या प्रमाणावर बेनामी खाती उघडून काळा पैसा पांढरा केला असल्याचा आरोप संबंधितांवर आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा