डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीट-युजी पेपरफुटी प्रकरण : एम्स-पटणा संस्थेचे चार विद्यार्थी सीबीआयच्या ताब्यात

नीट-युजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज एम्स-पटणा या संस्थेच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. हे विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे असल्याचं एम्स-पटणाचे  कार्यकारी संचालक डॉ. जी. के पाल यांनी सांगितलं. 
 
 
या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यापूर्वी सीबीआयनं आपल्याला आगाऊ सूचना दिली होती, तसंच आपल्या संस्थेनं तपास यंत्रणेला सहकार्य केलं अशी माहिती त्यांनी दिली. सीबीआयनं या विद्यार्थ्यांचे लॅपटॉप जप्त केले असून त्यांच्या खोल्या सील केल्या आहेत. तसंच त्यांची चौकशी सुरू आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा