केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं सामुहिक भ्रष्टाचार प्रकरणी काल मुंबईतून सात सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यात २७ स्थावर मालमत्तांच्या कागदपत्रांसह एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयनं सांगितलं. सीप्झमधलं जागा आरक्षण, आयात मालाचं वितरण आणि अन्य गैरव्यवहारांसाठी मध्यस्थांमार्फत लाच घेतल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. सह विकास आयुक्त, उप विकास आयुक्त आणि दोन सहायक विकास आयुक्तांचा यामध्ये समावेश आहे.
Site Admin | December 19, 2024 9:48 AM | CBI | Corruption Case | Mumbai