डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या व्यवस्थापकासह चौघांना सीबीआयकडून अटक

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं मध्य प्रदेशातल्या सिंगरौली इथल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड- NCL च्या व्यवस्थापकासह चौघाजणांना अटक केली. व्यवस्थापकाच्या घराची झडती घेतली असता, सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.  NCL साठी काम करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून ही रक्कम व्यवस्थापकानं लाच म्हणून घेतल्याची माहिती सीबीआयनं दिली.

 

सीबीआयनं अटक झालेल्या आरोपींपैकी एकजण मध्य प्रदेशात फार्म चालवतो, तसंच तो विविध कंत्राटदार,व्यापारी आणि NCL च्या अनेक अधिकाऱ्यांसाठी लाच घेण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करायचा, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीबीआय पथकानं सिंगरौली, जबलपूर आणि नोएडा इथं अनेक ठिकाणी तपास केला. त्यावेळी तिथून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, डिजीटल डिव्हाइस आणि अनेक आक्षेपार्ह कागदपत्र हस्तगत केली आहेत.