डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 25, 2024 7:30 PM | CBI | Kolkata

printer

कोलकातातल्या आरजी कर रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरु

कोलकाता इथल्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं आज सकाळी १५ ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. सीबीआयचं पथक आरजी करचे माजी प्राचार्य डाॅ संदीप घोष यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत. तसंच सीबीआय महाविद्यालयातचे नवे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांची चौकशी करत आहे. याशिवाय आरजी करचे प्राध्यापक डॉ. देबाशीष सोम, माजी वैद्यकीय अधीक्षक आणि उपप्राचार्य डॉ. संजय वशिष्ठ आणि वैद्यकीय सामुग्री पुरवठादार बिप्लव सिंग यांची देखील सीबीआय त्यांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा