डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 21, 2024 1:26 PM | CBI

printer

बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत सीबीआयची कारवाई

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं  बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी ८० हजार बिटकॉईनच्या माध्यमातून ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा निधी नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आलं आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर क्रिप्टोचलन फसवणूक प्रकरणात गुंतल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा