राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिपणी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेखा शर्मा यांनी केलेल्या तक्रारीनंतर मोईत्रा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ७९ कलमाअंतर्गंत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, मोईत्रा यांच्या आक्षेपार्ह विधानाची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. मोईत्रा यांचं विधान महिलांचा अधिकार आणि प्रतिष्ठेचं उल्लंघन करणारं असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.