स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं सर्बियाच्या द्वितीय मानांकित आणि सात वेळा विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा थेट सेट्समध्ये पराभव केला.
पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्कराजला जोकोविचने टायब्रेकरपर्यंत खेचलं, पण अल्काराजने टायब्रेकर जिंकून सामनाही खिशात घातला. मिश्र दुहेरीत पोलंड आणि तैवानच्या यान जेलिन्की आणि सू वे शे या जोडीनं मेक्सिकोच्या सँतियागो गोन्झालेस आणि जुलियाना ओलमोस यांच्यावर ६-४, ६-२ अशी मात केली.