आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं आहे. भारतीय संरक्षण दल लेखा सेवेच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना काल नवी दिल्ली इथं ते संबोधित करत होते. सरकारी नोकरीत कायद्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सर्वात सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. सेवानिवृत्त सैनिकांच्या निवृत्तीवेतनाचं वितरण करताना सहानुभूतीचं धोरण ठेवावं, असा सल्ला त्यांनी या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना दिला.
Site Admin | February 7, 2025 2:17 PM | उपराष्ट्रपती | नवी दिल्ली
आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं – उपराष्ट्रपती
