फ्रान्समधे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’,’खालिद का शिवाजी’ आणि जुनं फर्निचर या चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.
फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होत आहे.