डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा दिला राजीनामा

कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी ओटावा इथं एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही अनेक महिने संसद ठप्प राहिल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. जोपर्यंत नव्या नेत्याची निवड होत नाही तोपर्यंत ते प्रधानमंत्रीपदी काम करत राहतील असंही ट्रुडो यांनी सांगितलं. लिबरल पक्षाच्या नेतेपदी 11 वर्षं आणि नऊ वर्षं प्रधानमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या ट्रुडो यांना त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांकडून बंडखोरीचा सामना करावा लागला असून, त्यांच्या धोरणांमुळे त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा