अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांना प्रतिसाद म्हणून, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी देशात येणाऱ्या १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आहे. ओटावा इथं वार्ताहर परिषदेत बोलताना, ट्रूडो यांनी मंगळवारपासून ३० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आणि २१ दिवसांत १२५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर असाच कर लावायची घोषणा केली. या विषयावर विविध प्रातांचे प्रमुख आणि मंत्रिमंडळाशी चर्चा केली असून आणि मेक्सिकोचे अध्यक्ष शीनबॉम यांच्याशीही बोलणार असल्याचं ट्रूडो यांनी सांगितलं. खरंतर, कॅनडाला हे करायचं नव्हतं, परंतु यासाठी आता आम्ही तयार आहेत, असं सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रूडो यांनी म्हटलं आहे.
स्वतःच्या करप्रणालीद्वारे आणि इतर प्रति-उपायांसह अमेरिकेनं लादलेल्या करांना मेक्सिको प्रत्युत्तर देईल, असं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी म्हटलं आहे. मेक्सिकोच्या हितांचं रक्षण करण्यासाठी असे उपाय करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.