आपल्या देशातले तात्पुरत्या रहिवाशांच्या संख्येचं व्यवस्थापन व्हावं या हेतूने कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
इमिग्रेशन, रिफ्युजीस अँड सिटिझनशिप कॅनडाने काल वार्ताहरांना ही माहिती दिली. पुढच्या वर्षी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अभ्यास परवान्यांमध्ये यंदा पेक्षा १० टक्के कपात केली जाणार आहे.