डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा कॅनडा आणि मेक्सिकोचा निर्णय

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा निर्णय कॅनडा आणि मेक्सिको यांनी घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा , मेक्सिको आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे , त्याला प्रत्युत्तर म्हणून या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेमधून आयात केल्या जाणाऱ्या ३० अब्ज डॉलर किमतीच्या मालावर २५ टक्के शुल्क आकारलं जाईल, असं कॅनडानं घोषित केलं आहे, मात्र मेक्सिकोनं अद्याप तपशील जाहीर केलेला नाहीत. अमेरिकी मालावर प्रत्युत्तरादाखल शुल्क आकारणी केली तर अमेरिकाही शुल्कदरात वाढ करेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यावरही या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
कॅनडा ही अमेरिकेसाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ असून मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा