डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघात प्रचारसभा

महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये मदत देणार, महिलांसाठी महिला अधिकारी आणि कर्मचारी असणारी वेगळी पोलीस ठाणी राज्यभरात उभारणार अशी आश्वासनं ठाकरे यांनी या वेळी दिली. महायुतीच्या नेत्यांना निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याची आठवण झाली असून हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

महायुती सरकारच्या काळात सोयाबीन, कापूस, डाळ, कांदा या सर्वांचे हमीभाव पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं उद्धव ठाकरे आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या गैरकारभाराबाबत लोक आता प्रश्न विचारत असून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांची आज वरळीत प्रचारसभा झाली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा