झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी जोरदार प्रचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज प्रचार थांबणार आहे. युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडून काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी निवडणूक लढवत आहेत तर भाजपकडून नव्या हरिदास आणि लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटचे उमेदवार सत्यन मोकेरी यांच्यात तिरंगी लढत आहे.
आसाममध्येही विधानसभेच्या ५ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. एकूण ३४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपनं विधानसभेच्या ३ जागांवर तर आसाम गण परिषद आणि यूपीपीएलनं प्रत्येकी एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस पाचही जागा लढवत आहे.