येत्या ५ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून सर्व प्रमुख पक्षांचे नेते जाहीरसभा, रॅली, रोड शो आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, आज दिल्ली मतदारसंघात रॅली घेणार असून भाजपा नेते अनुरागसिंग ठाकूर, द्वारका, मंगोलपुरी आणि दिल्लीत विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत तर भाजपा नेत्या बांसुरी स्वराज शालिमार मतदारसंघातल्या मतदारांशी संवाद साधणार आहेत.
आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज नजफगड़, उत्तम नगर आणि दिल्लीत रोड शो घेणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील आज काही ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.