हरयाणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. इथं ९० जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी जम्मू-काश्मीरसह ८ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत मुद्रित माध्यमं, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मतदानोत्तर कल प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो
Site Admin | October 3, 2024 10:55 AM | Haryana Assembly elections