दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी ७ पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी ४८ तास प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येणार नाहीत.
या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी तसंच तमिळनाडू आणि उत्तरप्रदेशातल्या प्रत्येकी एका पोटनिवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल. मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.
Site Admin | February 3, 2025 1:35 PM | केंद्रीय निवडणूक आयोग | दिल्ली विधानसभा निवडणुक | प्रचार
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार
