डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्राच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल – प्रधानमंत्री

विधानसभा निवडणुकांसाठीच्या  प्रचाराने वेग घेतला आहे.  भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला.  महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप त्यांनी केला.

 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या सरकारने मिळवून दिल्याची आठवण करुन देत त्यांनी डबल इंजिन सरकार निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. वाढवण इथं विमानतळ बांधण्याच्या मागणीचा विचार आचरसंहिता संपल्यानंतर करु असं आश्वासन त्यांनी दिलं.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण यावेळी झालं.   शेतकऱ्यांना पाणीपुरवठा, औद्योगिक विकास, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास  अशी आश्वासनं त्यांनी दिली. धुळे जिल्ह्यात सहा राष्ट्रीय महामार्ग, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, सुलवाडे-जामफळ आणि अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

विधानसभा निवडणुकीसाठी  मोदींची महाराष्ट्रातली  ही पहिलीच प्रचारसभा होती. या जाहिर सभेला केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मंत्री दादा भुसे, अनिल पाटील, आदी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा