डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला, सर्व पक्षीय नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभरात आजही ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा धुळे, जळगाव आणि परभणी इथं सभा घेणार आहेत. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई आणि अहिल्यानगरमध्ये प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा चंद्रपूर आणि नागपुरातल्या विविध मतदारसंघात होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर तसंच मीरा भाईंदर इथं प्रचार करणार आहेत.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड, अकोला आणि नागपूर येथे प्रचार करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुण्यात प्रचार करणार आहेत. शिवाय भाजप नेते शिवराज सिंह चौहान, पियुष गोयल, प्रमोद सावंत आणि ज्योतिरादित्य शिंदे राज्यात ठिकठिकाणी प्रचार करणार आहेत.

 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे लातूर आणि सोलापूरमध्ये प्रचार करणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी मुंबईत प्रचार करणार आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट हे चंद्रपूर, वर्धा आणि मुंबईत प्रचार करणार आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभा पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये होतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघांत प्रचार करणार आहेत. तर आदित्य ठाकरे मुंबईत प्रचार करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरळीत प्रचार करणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा