डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने, सर्वच उमेदवारांनी वाढवला प्रचाराचा वेग

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्यानं, सर्व प्रमुख पक्षांनी तसंच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. 

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आज नागपुरात ४ प्रचारसभा घेणार आहेत तर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदिया आणि मुंबईत प्रचार करणार आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालना इथं प्रचारसभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी ते आज सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार नंदुरबार, नांदेड आणि अमरावतीमध्ये प्रचार करणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धुळे आणि जळगाव या मतदारसंघात प्रचार करणार आहेत. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात तर आदित्य ठाकरे यांनी भाईंदरमध्ये प्रचार केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा