दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारनं राबवलेल्या मद्य धोरणामुळे सरकारी तिजोरीतील २ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. नव्यानं स्थापन झालेल्या भाजपा सरकारने दिल्ली विधानसभेत काल कॅगचा अहवाल मांडला. आप सरकारनं राबवलेल्या या धोरणात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. मद्य धोरणामुळे आप सरकारवर टीकेची झोड उठली होती, यामुळे आम आदमी पार्टीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं सांगितलं जातं.
Site Admin | February 26, 2025 1:11 PM | CAG Report | Delhi
दिल्लीच्या मद्य धोरणामुळे महसूल तोटा झाल्याचा कॅग अहवालात ठपका
