रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. ही वाढ 2025 – 26 या पणन हंगामासाठी आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती वार्ताहर परिषदेत दिली.
मोहरीच्या किमतीत सर्वाधिक 300 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली असून मसूर डाळींच्या किमतींत 275 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभरा डाळीच्या किमतीत 210 तर गव्हाच्या एमएसपी मध्ये दीडशे रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये 3 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला आहे. या निर्णयाचा लाभ 49 लाख कर्मचारी आणि सुमारे 64 लाख निवृत्तीवेतन धारकांना होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीतून दर वर्षी 9 हजार 448 कोटी रुपये खर्च होणार आहेत.