केंद्रीय मंत्रिमंडळानं काल नैसर्गिक शेती, रेल्वे आणि तरुणांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे विविध निर्णय घेतले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सुरू करण्यात येणार असून त्यासाठी २ हजार ४८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या मिशनमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना सामावून घेतलं जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या ७ हजार ९२७ कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मनमाड-जळगाव या १६० किलोमीटरच्या चौथ्या रेल्वे मार्गिकेचा, तसंच भुसावळ- खांडवा दरम्यानच्या मार्गिकेचा यात समावेश आहे.
याच बैठकीत काल प्राप्तीकर विभागाच्या पॅन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली; यासाठी १ हजार ४३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सद्यस्थितीतली व्यवस्था अद्ययावत करून त्यासाठी एकत्रित पोर्टल तयार करण्यात येईल. सध्याचा पॅन क्रमांक तोच राहिल मात्र त्याची मजबूत सुरक्षा व्यवस्थाही असेल असं वैष्णव यांनी सांगितलं.