कमांड क्षेत्र विकास आणि जलव्यवस्थापन आधुनिकीकरणाची कामं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत करण्याला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. याकरता सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना जास्त पीक मिळवण्यासाठी मदत होईल. या अंतर्गत सुरू होणाऱ्या ७८ प्रकल्पांमध्ये ८० हजार शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल, असंही वैष्णव म्हणाले.
आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमधल्या तिरुपती-पकला-कटपाडी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. तसंच, सरकारने १ हजार ८७८ कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सहा पदरी झिरकपूर बायपास निर्मितीलाही मान्यता दिली आहे.