इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. या योजनेकरता २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे ९१ हजारपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती होणार आहे.
Site Admin | March 28, 2025 8:02 PM | Cabinet Decision
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणारी नवी योजना जाहीर
