पशुधन आरोग्य आणि रोगनियंत्रण कार्यक्रमाच्या सुधारित स्वरुपाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
पर्वतमाला प्रकल्पाअंतर्गत उत्तराखंडमधे सोनप्रयाग ते केदारनाथ या मार्गावर सुमारे १३ किलोमीटर लांबीचा रोपवे बांधण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या रोप वे मुळे ८ ते ९ तासांचा प्रवास ३६ मिनिटांवर येणार आहे.