भारतीय अन्न महामंडळात दहा हजार सातशे कोटी रुपयांच्या नव्या समभाग गुंतवणुकीला मंत्रीमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे. महामंडळाच्या कार्याला बळ मिळावं, या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे व्याज आणि अनुदानाचं ओझं कमी होईल. अन्नधान्याची किमान आधारभूत किमतीत खरेदी, अन्नधान्य साठा राखणं, किमतीत स्थिरता राखणं अशा बाबतीत अन्न सुरक्षेच्या धोरणात महामंडळाची महत्वाची भूमिका असते.
Site Admin | November 6, 2024 8:30 PM