डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

६,७९८ कोटींच्या दोन रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं ६ हजार ७९८ कोटी रुपये किमतीच्या २ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. नरकटियागंज ते दरभंगा, सितामढी-मुझफ्फरपूर तसंच एरुपलेम-नामबुरू या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. यामुळं अयोध्या ते सीतामढी, काठमांडू, जनकपूर आणि लुंबिनी रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहेत. तसंच आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावतीही रेल्वेशी जोडली जाईल. 

 

येत्या ५ वर्षात अवकाश क्षेत्रासाठी १ हजार कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडालाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत वर्षाला सरासरी दीडशे ते अडीचशे कोटी रुपये दिले जातील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा