डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंळाचा निर्णय

 

आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता ७० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. देशभरातल्या साडे चार कोटी कुटुंबातल्या सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

पीएम ई ड्राईव्ह योजना काल जाहीर करण्यात आली. या योजनेचा दुचाकी, तिनचाकी, ट्रक, रुग्णवाहिका तसंच ई बसला लाभ मिळेल. दोन वर्षांसाठीच्या या योजनेसाठी दहा हजार ९०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. देशभरात चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर यात भर देण्यात येत असून, सुमारे ८८ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. देशभरात जलविद्युत प्रकल्पांसाठी १२ हजार ४६१ कोटी रुपये, पीएम ग्रामसडक योजनेसाठी ७० हजार १२५ कोटी रुपये, पीएम ई बस योजनेअंतर्गत ३८ हजार, ई बस साठी तीन हजार ४३५ कोटी, मिशन मौसमसाठी दोन हजार कोटी रुपये निधीला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा