विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत सी व्हिजिल ऍपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या बाराशे ५९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील बाराशे ५० तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी स्वरुपात १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं सांगितलं.
Site Admin | October 26, 2024 6:28 PM | सी व्हिजिल ऍप