राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात आयोजित समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजीत पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचं स्वागत केलं.
सी. पी. राधाकृष्णन याआधी झारखंडचे राज्यपाल होते. तमिळनाडूमधे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडून गेले होते.